Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आ.सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी त्या चिमुरड्यांना दिला मायेचा आधार..

Oct 14, 2021

 

नांदगाव येथे रेल्वे अपघातात मुत्यू पावलेल्या स्वाती शिंदे यांच्या कुटुंबीयांची आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम सुहास कांदे यांनी सांत्वन पर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या.नांदगाव रेल्वे दुर्घटनेत स्वाती शिंदे यांची प्राणज्योत मावळली होती . त्यांना चार लहान मुली असून,या चिमुरड्यांच्या नावे आमदार सुहास कांदे आणि सौ.अंजुम कांदे यांनी प्रत्येक मुलीच्या नावे सुरक्षा ठेव रक्कम बँकेत जमा केली. त्याचे रीतसर कागदपत्र या वेळी त्या चिमुरड्यांच्या हाती सुपूर्द केले. तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याचे आश्वासन अंजुम कांदे यांनी या वेळी दिले.
नियतीच्या मनात आलं की होत्याचं नव्हतं होऊन जातं याही घटनेत तसच काही झालं आणि संपूर्ण नांदगाव शहर हादरून गेलं.स्वाती ताई शिंदे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि चार चिमुरड्यांच्या मातेचं छत्र हरपलं, ऐकायला ही अंतकरण पिळवटून टाकणारी ही घटना आहे.ही परिस्थिती त्या परिवाराला भविष्यात किती कष्टदायक असेल याचा विचार आपण करू शकतो.घरात आईचं नसणं हे किती क्लेशदायक असतं हे आपण समजू शकतो.पण नियती च्या पुढे आपलं काही चालत नाही आपल्या हातात आहे ते फक्त जे उरलंय त्याला जीव लावणं.आज त्या कुटुंबास आणि त्या चार निरागस मुलींच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. एक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी निभवतांना या गोष्टीचे भान ठेऊन आमदार सुहास आण्णा कांदे आणि सौ.अंजुम ताई कांदे यांनी चारही चिमुरड्यांच्या नावे सुरक्षा ठेव रक्कम बँकेत जमा केली आहे. निकिता रवी शिंदे,नंदिनी रवी शिंदे,साक्षी रवी शिंदे,स्वामींनी रवी शिंदे यांच्या प्रत्येकीच्या नावे जमा ठेविचे कागदपत्र त्यांच्या कडे सुपूर्द केले. सौ.अंजुम ताई कांदे यांनी रवी शिंदे यांच्या घरी सांत्वन पर भेट देऊन कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाल्या. या निरागस मुलींशी बोलतांना त्यांच्या शून्य नजरा आणि निशब्द चेहर्या कडे पाहून उपस्थित सर्वांनाच मायेचा कंठ दाटून आला. सर्वांना गहिवरून आले.या पुढे भविष्यात येणारी कोणतीही अडचण सांगण्यास मागे पुढे पाहू नका मला लगेच फोन करा असे ताईंनी मुलींना आवर्जून सांगितले.मुलींच्या शिक्षणात हातभार लावण्याचे आश्वासन ही दिले. झालेली घटना अतिशय वेदनादायी असली तरी आता भविष्यात आपल्या मतदारसंघाचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही सदैव तूमच्या सोबत असल्याचा विश्वास अंजुमताई कांदे यांनी या कुटुंबीयांना दिला.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव,उज्वला खाडे, संगीता बागुल,ललिता राऊत,सरला घोगळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]