Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“शारदीय नवरात्रौत्सव”…. आज नवमी माळ

Oct 14, 2021

मनमाड : गेल्या आठ दिवसांपासुन सुरू असणाऱ्या नवरात्री उत्सवाची आज नवमी माळ , यंदाच्या वर्षी नवरात्रीच्या काळामध्ये मंदिरे उघडण्यात आल्याने भाविकांकडुन मोठ्या आनंदात आणि उत्साहात नवरात्री साजरी करण्यात आली.

आज आपण मनमाड शहरातील पुरातन असणारे गोदावरी माता मंदिर पाहुया , गोदावरी माता मंदिर अनेक वर्ष पुरातन असुन कामानिमित्त मनमाड येथे स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीय नागरिकांनी गोदावरी मातेची स्थापना केली आहे असे बोलले जाते. गोदावरी मातेचे रूप अठरा भुजा असुन मुर्ती समोर मातेचे वाहन असणारे सिंह विराजमान आहे.मंदिरा समोर महिषासुर आणि हवनकुंड असुन मंदिर परिसरात दिपमाळ , श्री महादेव मंदिर , श्री शनी मंदिर , श्री मारुती मंदिर आहे.मंदिर परिसर शांत आणि प्रसन्न असुन मंदिरा समोरून नदी वाहत असल्याने मंदिराला नैसर्गिक सौन्दर्य देखील लाभले आहे.काही वर्षांपुर्वी शहरातील आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता , आजही मंदिराची संपूर्ण व्यवस्था आझाद हिंद केसरी ट्रस्ट कडुनच बघण्यात येत असते.

नवरात्रीच्या काळामध्ये श्री गोदावरी माता मंदिर येथे नऊ दिवस यात्रोत्सव भरत असुन , मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करून अनेक धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात येते, शहर आणि परिसरातील शेकडो भाविक हे नवरात्री काळामध्ये श्री गोदावरी मातेच्या दर्शनासाठी येत असतात.                                                                         

अजून बातम्या वाचा..

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड :- मराठा आरक्षणासाठी  राज्य शासनाने  काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या...

read more
श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]