loader image

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

Feb 15, 2024


येवला – ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रामनाथ उमाजी देवडे हे १५ हजाराची घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या लाच प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा बदापूर येथे शालेय समिती अध्यक्ष असून जि.प.शाळा बदापूर यास PM श्री निधीतुन ७.३० लक्ष रु. मंजूर झाले असून सदर निधीतून शाळेत सुशोभीकरण व परसबागचे काम चालू असून देवडे यांनी तक्रारदार यांना सदर ग्रामपंचायत सदस्या या नात्याने ग्रामपंचयातच्या माध्यमातुन कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे १४/०२/२०२४ रोजी २०,०००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडी अंती १४/०२/२०२४ रोजी १५,०००/- रु. लाचेची रक्कम स्वीकारली त्यांना असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचेचा मागणीची सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, ४१ वर्ष.
*आलोसे – रामनाथ उमाजी देवडे, वय- ५२ वर्षे, ग्रामपंचायत सदस्य, चिंचोडी खु. बदापूर ग्रुप ग्रामपंचायत, ता.येवला, जि.नाशिक
*लाचेची मागणी- १४/०२/२०२४ रोजी २०,०००/- रु. .
*लाच स्वीकारली – १४/०२/२०२४ रोजी १५,०००/- रु.

*लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा बदापूर येथे शालेय समिती अध्यक्ष असून जि.प.शाळा बदापूर यास PM श्री निधीतुन ७.३० लक्ष रु. मंजूर झाले असून सदर निधीतून शाळेत सुशोभीकरण व परसबाग चे काम चालू असून आलोसे यांनी तक्रारदार यांना सदर ग्रामपंचायत सदस्या या नात्याने ग्रामपंचयात च्या माध्यमातुन कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे दि.१४/०२/२०२४ रोजी २०,०००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडी अंती दी.१४/०२/२०२४ रोजी १५,०००/- रु. लाचेची रक्कम स्वीकारली त्यांना असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे.

*सापळा अधिकारी – नाना सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक- पोहवा/ सचिन गोसावी, पोना/ अविनाश पवार, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.