Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड़ सार्वजनिक वाचनालय तर्फे वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने 433 पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी खुली !

Oct 15, 2021

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व साहित्य परंपरेमध्ये मानाचे,गौरवाचे स्थान असणार्‍या आणि मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळख असणार्‍या आणि “व्रत अखंड वाचक सेवेचे” हे ब्रीद वाक्य घेऊन जागरूक वाचक आणि दानशूर देणगीदार यांचे अखंड सहकार्य ने मनमाड शहर व ग्रामीण परिसरात सातत्याने वाचक व साहित्य चळवळ सुरु ठेवणाऱ्या मनमाड़ सार्वजनिक वाचनालयाची स्थापना ०१ मे १९१५ रोजी झाली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून १०७ वर्ष इतक्या मोठ्या कालावधीसाठी कार्यरत असणारे हे वाचनालय मनमाड शहराच्या इतिहासातील सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक घटनांचे गेल्या १०७ वर्षापासून साक्षीदार आज ह्या मनमाड सार्वजनिक वाचनालय ला सध्या सोशल मीडिया च्या (व्हाट्सएप, फ़ेसबुक, इंटरनेट, टिविटर, इंस्टाग्राम, टेलीविजन संगणक) जगाशी स्पर्धा करावी लागत आहे तरी देखील आपली एक नवी सांस्कृतिक ओळख कायम ठेवत मनमाड सार्वजनिक वाचनालया ने विजया दशमी /व सलग सहाव्या वर्षी वाचक प्रेरणा दिना(भारतरत्न डॉ ऐ. पी.जे.अब्दुल कलाम जयंती) निमित्ताने सुमारे एक लाख चार हजार रुपये किंमतीची 433 पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांना साठी खुली केली या ग्रंथ संपदे मध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पर्यावरण, पर्यटन, प्रवासवर्णन, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक, इतिहास, ऐतिहासिक, व्यापार मार्गदर्शन, नोकरी मार्गदर्शन, गायन विषयक,गुंतवणूक मार्गदर्शन, पाककला, व्यवसाय मार्गदर्शन, कथा,कादंबरी, कथासंग्रह,ललित लेख साहित्य, शोध कथा,अनुवादित पुस्तके, बाल साहित्य, कविता संग्रह,व्यक्तिमत्त्व विकास, संगणक विषयक,विविध कला,चरित्र, महिला विषयक पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, सामान्य ज्ञान, भूगोल, जोतिष्य विषयक,संगीत विषयक, उद्योग विषयक,शेती विषयक,आरोग्य संबंधित, जीवशास्त्र ,औषध विषयक,चित्रपट ,नाटक, एकांकिका,संस्कार संस्कृती विषयक,योगशास्त्र,अर्थशास्त्र,मानस शास्त्र,माहिती कोश, शब्द कोश, वास्तू शास्त्र,वैचारिक, विनोदी कथासंग्रह,मुलाखत संग्रह,संशोधनात्मक, समाजशास्त्र, संदर्भ ग्रंथ, विज्ञान विषयक,वनौषधींसंबंधित युध्द कथा,आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यासह विविध विषयांची मान्यवर लेखकांची पुस्तकें समाविष्ट आहेत या प्रसंगी विद्येची देवता मातामहासरस्वती / डॉ ऐपीजे अब्दुल कलाम यांचे प्रतिमेला माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले वरील ग्रंथ संपदे चा वाचकांनी वाचन छंद पूर्ण करणे साठी उपयोग करावा असे आवाहन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितिन पांडे,सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष सुरेश शिंदे,प्रदीप गुजराथी ,संचालक नरेशभाई गुजराथी ,प्रज्ञेश खांदाट यांनी केले आहे या वेळी ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर सौ नंदिनी फुलभाटी , अक्षय सानप राहुल लांबोळे अभिषेक पितृभक्त उपस्थित होते उपक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे ,सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मनमाड : येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव

सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव

मनमाड :येथील सेंट झेवियर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदान प्रक्रियेचा अनुभव देण्यात...

read more
बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

बघा व्हिडिओ – धावत्या रेल्वे मधून धूर निघाल्याने प्रवाशांत घबराट; प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली

मनमाड रेल्वे स्थानकाहून नाशिक कडे जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे गाडीच्या एका...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरातील नगर परिषद शाळांच्या इमारतींचे होणार नूतनीकरण – सौ अंजुम सुहास कांदे यांच्या शुभहस्ते विविध ठिकाणी भूमिपूजन

नांदगाव आणि मनमाड शहरातील नगर परिषद शाळांच्या इमारतींचे होणार नूतनीकरण – सौ अंजुम सुहास कांदे यांच्या शुभहस्ते विविध ठिकाणी भूमिपूजन

मनमाड नगर परिषद शाळा इमारत नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते...

read more
विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपवर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]