Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुका कार्यकारणी जाहीर !

Oct 16, 2021

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी 1990 साली कै.अण्णासाहेब पाटील यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली होती. संघटनेच्या अविरत प्रयत्नामुळे मराठा तरुणांना उद्योग व्यवसायात अर्थ सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळची स्थापन केली तसेच मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अर्थ सहाय्य करण्यासाठी सारथी या संस्थेची निर्मिती करण्यात आली, यामुळे समाजाला मोठा दिलासा मिळाला, परंतु मराठा महासंघाचे कार्य मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित राहिल्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत पोहचू शकले नाही, कालपरत्वे समाजापुढे नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत,

मराठा आरक्षण मिळवीणे हे सुध्दा मोठे आव्हान आहे, हि आव्हाने स्विकारन्यासाठी मराठा समाजाला एकसंघ करुन मोठी ताकद गाव पातळीवर उभी करण्याच्या उद्देशाने मराठा महासंघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत नांदगाव तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुका कार्यकारणी :
लोखंडे भिमराज गंगाधर – (तालुका अध्यक्ष/प्रमुख), शेळके सुरेश बाळनाथ (तालुका कार्य अध्यक्ष) वडघुले विशाल शिवाजी ( तालुका उपाध्यक्ष), सरोदे रावसाहेब व्यंकटराव (तालुका उपाध्यक्ष), सुर्यवंशी भरत प्रभाकर (तालुका सरचिटणीस), काकळीज गणेश कचरु (तालुका संघटक), लोखंडे महेंद्र विठ्ठल (तालुका संघटक), जाधव बापुसाहेब साहेबराव (तालुका उपाध्यक्ष), गरुड ज्ञानेश्वर गोविंद (तालुका संघटक), नाठे रवींद्र चंद्रभान (तालुका उपाध्यक्ष), श्री जगताप प्रकाश ज्ञानेश्वर (तालुका संघटक), जाधव दिलीप रमण (तालुका उपाध्यक्ष), डमरे विनोद बबनराव (तालुका उपाध्यक्ष), झाल्टे आकाश रामदास (तालुका चिटणीस), वाळेकर शंकर मुरलीधर (कायदेशीर सल्लागार).

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]