इंद्रायणीनगरला लसीकरण शिबिर मिशन कवचकुंडल अंतर्गत राज्यात दररोज किमान १५ लाख नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इंद्रायणीनगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नाना तुपे, डॉ. प्रकाश चव्हाण, परिचारिका बागूल यांनी लसीकरण करण्यासाठी सहभाग नोंदवला. चेअरमन संजय बागूल यांनी याकामी शाळा उपलब्ध करून दिली. भाजपचे शहराध्यक्ष उमेश उगले, रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजू आहेर, अनिल आव्हाड, गणेश पाटील, विकास ताडगे, प्रशांत आयनोर, श्याम पाटील, अमोल गायकवाड, रवी तुसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
“काळ्या रंगात भक्तीचा उजळ प्रकाश!” — चांदवडच्या शिक्षकाची आगळीवेगळी विठ्ठलभक्ती
चांदवड | आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव विद्यालयातील...










