Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता राष्ट्र उद्धाराची : डॉ.श्रीपाद जोशी

Oct 16, 2021

येवला (प्रतिनिधी) : मुकनायक,जनता,प्रबुद्ध भारत या मुखपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक,आर्थिक,धार्मिक,सांस्कृतिक विकास व उत्थानचे पत्रकारिता केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता राष्ट्र उद्धाराची होती
असे मत जेष्ठ साहित्यीक डॉ श्रीपाद जोशी (नागपूर) यांनी मांडले.
धर्मांतर घोषणेचा ८६ वा वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२१ मध्ये आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि आजची प्रसार माध्यमे या विषयावर ते बोलत होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता प्रसार माध्यमाची नव्हती तर जनमतपत्र,विचारपत्र,मतपत्र होती.त्यांनी मुकनायक बनून लोक चेतनासाठी त्यांची पत्रकारिता केली.बहिष्कृत भारताला हक्क मिळवून देण्यासाठी,उद्धारासाठी मूकनायक ची निर्मिती केली
बाबासाहेब आंबेडकर विचार इंग्रजी तुन करायचे आणि मराठीतून व्यक्त करत होते.प्रेसफंडाची संकल्पना मांडली,उपेक्षितांच्या राजकारणाचा पाया, मराठी भाषेचा अस्सल तिखटपणा पत्रकारितेत होता
आजची पत्रकारिता मास मीडिया झाली आहे.पत्रकारितेचा धर्म,हेतू,हित पाळला जात नाही फक्त जाहिरात दारांना आकर्षित करण्यासाठी पत्रकारिता उरली आहे असे खेदाने नमूद करावे लागेल. त्यामुळे आपला मेंदू गहाण ठेवणारी पत्रकारिता निर्माण होत असेल तर माध्यम साक्षरतेची गरज आज अधिक निर्माण झाली आहे असे डॉ. जोशी म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक प्रा.अर्जुन कोकाटे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून तिसऱ्या पुष्पाचे उदघाटन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ती महोत्सव समितीचे निमंत्रक, प्रवर्तक शरद शेजवळ यांनी केले.कार्यक्रमास युट्यूब तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी यांचे होते..सूत्र संचालन व आभार मिलिंद गुंजाळ यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]