Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

१७ ऑक्टोबर – ‘गरिबी हटाव दिन’!

Oct 17, 2021

 
गरिबी हा मानवतेच्या प्रगतीतला एक मोठा अडसर आहे. गरिबीचा संपूर्ण नायनाट झाला तरच जगभर समानता फैलावू शकते. राष्ट्रकुलाने १९९२ साली १७ ऑक्टोबर हा दिवस ‘गरिबी हटाव दिन’ म्हणून घोषित केला होता. या जगातली, विशेषत: विकसनशील देशातल्या गरिबीचे उच्चाटन व्हावे, हा यामागचा उद्देश होता व त्यासंबंधी जनजागृती व्हावी म्हणून हा सारा खटाटोप होता.
त्याआधी, १७ ऑक्टोबर १९८७ रोजी पॅरिसमधील ट्रोकेडेरो प्लाझा येथे एक लाख लोकांनी जमा होऊन, त्यांनी उपासमार, हिंसा आणि संबंधितांकरवी दुर्लक्षित झाल्याने गरिबीचे बळी ठरलेल्या लोकाप्रती सहानुभूती व्यक्त केली होती. तद्नंतर, २०००सालच्या सहसकाच्या करारांतर्गत जगभरातील गरिबी रेषेखालील लोकांची संख्या अर्ध्यांनी कमी करण्याचा निश्चय करण्यात आला होता. जगातले २३ टक्के लोक गरिबीने ग्रासले आहेत, ही वस्तूस्थिती आहे.

गरिबीत जीवन जगणाऱ्यांची धडपड, खटपट समजावी, त्यांच्या मागण्या समजावून घेता याव्यात आणि गरिबांनाच गरिबीशी संघर्ष करण्यास प्रवृत्त करावे हा प्रस्तुत दिनाचा उद्देश आहे. केवळ सरकारे आणि सामाजिक संस्थाच नव्हे तर गरिबी हटाव मोहिमेस हातभार लावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ठरते. अर्थात गरिबी केवळ विकसनशील देशात आहे असे नव्हे, तर प्रगत राष्ट्रातील काही नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत.

या वषीर्ची प्रस्तूत दिनाची घोषणा आहे, ‘गरिबीतून सभ्यकामासाठी सेतू उभारा’ आणि राष्ट्रकुलाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात सोहळा होत आहे. गरिबी हटाव मोहीम सध्या कठीण कसोट्यांमधून मार्गक्रमण करीत आहे. वाढती बेरोजगारी, उद्योगधंदे कोसळणे, प्रशिक्षणाचा अभाव, कामाच्या ठिकाणी वाढणारी हलाखीची स्थिती, या समस्या आज मोठ्या प्रमाणात भेडसावित आहेत. जागतिक मजूर संघटनेनुसार, जगभरच्या रोजगारात कामगारांचा वाटा अर्धाअधिक असूनही तरुण मंडळींतील बेकारीचे प्रमाण वर्षागणिक वाढत चालले आहे. वास्तविक राष्ट्रकुलाने २००८-२०१७ हे दशक गरिबी हटाव मोहिमेसाठी समपिर्त केलेले असून ‘सकलांना रोजगार आणि सभ्यतेने काम करण्याची संधी’ हे खूप पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधला आहे. त्याला अनुसरूनच यंदाच्या गरिबी हटाव दिनाच्या कार्यक्रमाची आखणी केली गेली आहे.

शैक्षणिक संस्थाद्वारे मिरवणुका, नाटके, सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम, स्पर्धा इत्यादीद्वारा गरिबीचे उच्चाटन करणारे संदेश पसरविले जातील. उद्याच्या सुंदर जगासाठी, आज गरिबी हटविण्याचा प्रत्येकाने ध्यास घ्यायला हवा, हेच खरे. विशेषत: गरिबीच्या उच्चाटनासाठी गरीब लोकांची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

अजून बातम्या वाचा..

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]