loader image
[ays_poll id=7]

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता !

Oct 18, 2021


राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा, मंदिरे सुरु केली आहेत. आता राज्यातील निर्बंध अजून कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्ससोबत आज एक मोठी बैठक होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. पुढील काही दिवसात राज्यातील मॉल, दुकानं, हॉटेल्स याबाबत काही अटी नियम शिथिल होतील असे सरकारकडून संकेत मिळतायत, त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज बोलाविलेली टास्कफोर्स सोबतची बैठकी महत्वाची मानली जात आहे.

सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही 50 टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. दसरा आता पार पडलाय आणि दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सण उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यातच मुंबईत काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णयही एक दोन दिवसातच सरकारी जारी करेल अशीही सूत्रांची माहिती आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.