Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक !

Oct 18, 2021

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला रविवारी हरियाणातील हांसी येथे पोलिसांनी अटक केले. युवराजनं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यावर जातीवाचक टिप्पणी केली होती आणि त्याविरोधात हांसी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. त्यानं ही टिप्पणी मागच्या वर्षी रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅट दरम्यान केली होती आणि त्यात त्यानं युझवेंद्र चहलवर अपमानजनक टिप्पणी केली होती, हांसी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर युवराजला औपचारिक जामिनावर सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात हायकोर्टानं युवराजला जामिन दिला होता. युवराजसह सुरक्षारक्षक आणि ४–५ स्टाफ व वकील होते. 

रोहित शर्मासोबत इंस्टाग्नामवर चॅट करताना त्यानं चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ८ महिन्यांनंतर हरयाणा पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केला होता. हिसार क्षेत्रात येणाऱ्या हन्सी पोलिस स्थानकात युवीविरोधात IPC कलम (Sections) 153, 153A, 295, 505, उपकलम 3 (1) (r) and 3 (1) (5) of the SC/ST Act नुसार FIR दाखल झाला होता. दलितांच्या हक्कासाठी लढणान्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीन चहलला ‘भंगी‘ असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित शासकीय...

read more
के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]