मनमाड-उमराणे या राज्य महामार्गावरिल देवळा तालुक्यातील गिरणारे शिवारात व चांदवड तालुक्यातील दरेगाव या गावाजवळील गिरणारे घाटातुन जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच असलेल्या दरेगाव गावातील शेतकरी विनोद गांगुर्डे यांच्या गिरणारे शिवारातील शेतावर सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घोडा व शिंगरु यांना जीव गमवावा लागला. सकाळच्या सुमारास येथील शेतकरी बाजीराव गायकवाड हे शेतात गेले असता त्यांना शिंगरु विव्हळत असल्याचे दिसून आले. मात्र घोडयाने आधीच आपला प्राण सोडला होता. त्यानंतर काही क्षणात शिंगरु ही मुत्युमुखी पडले.
पावलांचे ठसे पाहता तो वाघ असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. मात्र वनविभागाने तो बिबट्या असल्याचे सांगितले आहे. सदर बिबट्याच्या पावलांबरोबरच त्याच्या बछड्याचेही पावलं दिसत असल्याने बिबट्या सोबत बछडे सुध्दा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे. यावेळी देवळा वनविभागाच्या वनरक्षक ज्योती सोनवणे, वनमजुर ईश्वर ठाकरे यांनी पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडे शवविच्छेदनासाठी घोडे व शिंगरु सोपविण्यात आले आहे. यावेळी दरेगावचे पोलीस पाटील सोमनाथ गांगुर्डे, गिरणारे येथील ईश्वर पाटील आदी उपस्थित होते. बिबट्याच्या संचारामुळे परिसरात भितीदायक वातावरण आहे.
देशाविरोधी शक्तींच्या षडयंत्रांना हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा – मा.आमदार अमोल जावळे
भाजपा नाशिक (उत्तर) जिल्हा राष्ट्रीय चिंतन संवाद बैठक मनमाड येथे संपन्न सध्या देशात व राज्यात...










