Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ईद-ए-मिलाद घरी राहूनच साजरी करावी – जिल्हाधिकारी सूरज मांढरे!

Oct 18, 2021

कोरोना विषाणूचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्या अनुसंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत.  राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) सण घरी राहूनच साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

‘कोविड-19’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरा
करण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करून हा सण शक्यतो घरी राहूनच साजरा करावा. तसेच या सणानिमित्त मिरवणूक काढावयाची असल्यास पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घेण्यात यावी. या एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त पाच जणांना परवानगी अनुज्ञेय असेल. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक असून त्याकरीता सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात यावी, असेही
जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]