Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दुर्गम मलंग गडावर मनमाडच्या गिरिप्रेमिंची यशस्वी चढाई!

Oct 18, 2021

महाराष्ट्रातील कल्याण जवळ असलेल्या हाजी मलंग पर्वत रांगेतील अतिशय दुर्गम व आपल्या विशिष्ट रचणे मूळे प्रसिद्ध असलेल्या मलंग गडावर मनमाडच्या छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, कंचन ज्वेलर्सचे संचालक तुषार गोयल, रेल्वे अधिकारी संदीप पाटील व बांधकाम व्यावसायिक गणेश वाहले यांनी यशस्वी आरोहण करीत थरारक अनुभव घेतला.
नाशिकच्या पॉइंट ब्रेक एडवेंचर समूहाच्या वतीने आयोजित या साहसी मोहिमेत जवळपास चार तासांची खडी चढाई, कडक उन, घामाच्या धारांनी चिंब भिजत एका उभ्या खडकावर लावलेला 10 ते 12 फुटांचा तुटलेल्या पायऱ्यांवर लावलेला आडवा अधांतरी पाईप खाली बघितले तर खोल दरी जेमतेम एक माणूस उभा राहील अशा कातळात खोदलेल्या अर्धवट पायऱ्या त्यावर दोराच्या सहाय्याने आधार घेत केलेल थरारक पोल क्रॉसिंग बाले किल्ल्यावर जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी उभ्या खडकावर खोदलेल्या पायऱ्यांचा थरार अनुभवत शेवटी खाली उतरण्यासाठी 100 फुटांचे प्रस्तरारोहण असा एकदम आगळा वेगळा अनुभव या मोहिमेच्या निमित्ताने सर्वांनी अनुभवला व मलंग गडाच्या बालेकिल्ल्यावर चढाई करणारे पहिले मनमाडकर होण्याचा बहुमान पटकावला.

अजून बातम्या वाचा..

डॉ.ए.के.सिन्हा ह्यांचा ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

डॉ.ए.के.सिन्हा ह्यांचा ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

मध्य रेल्वे चे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी (मुंबई) आयु.डॉ.ए.के.सिन्हा हे मनमाड येथे आले असताना ऑल...

read more
प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात आज श्री सत्य विनायक महापूजा व छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात आज श्री सत्य विनायक महापूजा व छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक...

read more
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे मनमाड – येवला रोड येथील ऊर्जा भवन कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे मनमाड – येवला रोड येथील ऊर्जा भवन कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि ग्राहकांच्या समस्या सोडवण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]