मनमाड – मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव २०२२ निमित्ताने मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री नीलमणी मंदिरात सलग २६ व्या वर्षी आज सकाळी ठीक ०९-०० वाजता श्री सत्य विनायक महापूजा तसेच यंदाही सलग ०८ व्या वर्षी आज सोमवार दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी 6.00 वाजता श्री निलमणी महागणपतीस छप्पन महाभोग (महानैवेद्य) अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी धार्मिक परंपरा असणार्या श्री सत्य विनायक महापूजा व छपन्न महाभोग (महानैवेद्य) या कार्यक्रमामध्ये सर्व गणेशभक्तांनी स्वतःच्या घरी तयार झालेले सर्व प्रकारचे नैवेद्य आज सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मंदीरात घेवून यावे आणि या महाप्रसादाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











