केंद्रीय आरोग्यमंत्री व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. भारती पवार यांच्या उपस्थितीत ओझर येथे बाणगंगा सहकारी संस्थेच्या सभागृहात शेतकरी मेळावा संपन्न झाला यात लाईट, नवीन dp,सक्तीचे वीजबिल, वाढीव वीजबिल, तसेच dp कट करण्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या दुसऱ्याही समस्या समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यानना त्या त्वरित सोडवण्यासाठी सूचना केल्या .तसेच ह्या वेळीआशा सेविका ,एच ए एल. कामगार, शिक्षक,तसेच नाभिक ,कुंभार मुस्लिम आदिवासी समाजाच्या विविध समस्या समजून घेतल्या .व त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले ह्या प्रसंगी जि. प. सदस्य यतीनजी कदम ,मा. आमदार माई कदम, प्रांत. अर्चना पठारे ,तहसीलदार घोरपडे साहेब ,भाजपा नेते नितीन जाधव, किशोर काका कदम, श्रीराम आढाव, योगेश चौधरी, प्रशांत गोसावी, नितीन गायकर ,सचिन मोगल ,योगेश तिडके आदी कार्यकर्त्यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ह्या नंतर पिंपळगाव येथे शेतकरी मेळाव्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला .व नवनिर्वाचित द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांचा सत्कार केला. ह्या प्रसंगी द्राक्ष संदर्भात येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करत त्या सोडवण्यासाठी ,तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात द्राक्ष क्लस्टर च्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान व नवीन द्राक्षवाण ,तसेच एक्स्पोर्ट बाबतीत येणाऱ्या सर्व अडचणी आपण सोडवून परदेशात आपल्या द्राक्षाला कशी बाजारपेठ मिळेल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे ना. डॉ. भारती पवार यांनी सांगितले या प्रसंगी माणिकराव पाटील, विलास शिंदे, जगन्नाथ खापरे, कैलास भोसले, सुरेश डोखळे , बापू पाटील,सतीश मोरे नरेंद्र जाधव, रवींद्र निमसे, बाळासाहेब गडाख ,रवींद्र बोराडे, सुरेश कळमकर, राजेंद्र मोगल, संजय गाजरे, अशोक मोरे, अनंत मोरे, शैलाबाई मोरे, प्रतिमा मोरे, संध्या मोरे,, ज्योती निरगुडे, गोरख ढगे, शिवाजी मोरे, संजय पेंढारी, संजय ताकाटे बबन भालेराव ,किशोर निफाडे, आदींसह अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते
देशाविरोधी शक्तींच्या षडयंत्रांना हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा – मा.आमदार अमोल जावळे
भाजपा नाशिक (उत्तर) जिल्हा राष्ट्रीय चिंतन संवाद बैठक मनमाड येथे संपन्न सध्या देशात व राज्यात...










