Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जेष्ठ नागरीक संघर्ष समिती तर्फे मराठा महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार!

Oct 18, 2021

मनमाड जेष्ठ नागरीक संघर्ष समिती तर्फे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जेष्ठ नागरीक संघर्ष समितीच्या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भास्कर विष्णु झाल्टे व नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे यांचा जाहीर सत्कार जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, कार्याध्यक्ष कामगार नेते नरेंद्र कांबळे, सचिव एस.एम.भाले यांच्या हस्ते करण्यात आला तसेच तालुक्याचे कार्याध्यक्ष सुरेश शेळके (अप्पा) व तालुका उपाध्यक्ष विशाल वडघुले यांना देखील दुरध्वनी संपर्काद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नांदगाव तालुका कार्यकारणीच्या वतीने तालुका प्रमुख भिमराज लोखंडे यांनी आभार मानले,
या वेळी जेष्ठ नागरिक संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आर बी ढेंगळे, कृष्णाजी पगारे, दिलीप आव्हाड, डॉ एस एम बहादुरे, एस बी चौरसिया, गणपत पगारे, एस डी देवकर, रामभाऊ गवळी, रत्नाकर कांबळे, वसंत महाले, सुर्यकांत राजगिरे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]