येवला ::दिनांक 18 डिसेंबर रोजी अधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी सोपान कासार यांच्या अध्यक्षतेखाली येवला तालुक्यातील वाढत्या कोरोना ग्रस्त रुग्णसंख्या च्या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेण्यात आली
यावेळी ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या पारेगाव येथे ८ दिवसांचा लोंकडाऊन घोषित करण्यात आला तसेच इतर ज्या गावांमध्ये सक्रिय रुग्ण संख्या ही १० पर्यंत गेल्यास त्या गावात लोंकडाऊन घोषित करण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी कासार यांनी दिली आहे
दरम्यान तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी वाडी, वस्ती, शेतकऱ्यांच्या बांधावर गावागावात लसीकरणासाठी टीम तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे
बैठकीसाठी तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते, पालिकेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर संगीता नांदुरकर ,शहर पोलीस साहेब निरीक्षक नितीन खंडागळे ,तालुका पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, नगरसुल आरोग्य केंद्र प्रमुख डॉ जितेंद्र डोंगरे , येवला रुग्णालयाचे डॉक्टर सोनवणे पोलीस हवालदार चंद्रकांत निर्मळ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते
सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या...










