मनमाड नगर पालिका कर्मचार्यांना दिवाळी सणाच्या पार्शभूमीवर देय रक्कम त्वरित अदा करण्यात यावी तसेच विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना यांचे वतीने मनमाड नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या विविध मागण्याबाबत प्राथमिक चर्चा करणेसाठी प्रशासकीय अधिकारी श्री. पाटील व अस्थापना पर्यवेक्षक श्री.बोडके यांचे उपस्थितीत बैठक घेणे व त्यानंतर मुख्याधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात यावी, अशी विनंती देखील करण्यात आली.
यापूर्वी प्रमोद सांगळे यांची महाराष्ट्र नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना मनमाड शहर शाखा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा राज्य कार्यकारिणी सदस्य किरण आहेर यांनी केली.
यावेळी किरण आहेर, संजय गवळी, प्रमोद सांगळे, अशोक कटारे, दीपक पांडे, जावीद शेख, कैलास पाटील, मिलिंद गांगुर्डे, अमोल साली, संजय आरोटे, मेहमूद शेख, सुनील दराडे व कर्मचारी उपस्थित होते.













