कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नाशिक जिल्यातील काही तालुक्यात अजूनही कायम असून यावर तोडगा म्हणून निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे ग्रामपंचायतीने डॅशिंग निर्णय घेतला आहे. ज्या ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही त्यांना आता गावात न फिरू देण्याचा दबंग निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
जसे लस घेतलेली नाही त्यांना गावात न फिरू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसाच ज्या परिवाराचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे त्या परिवारास ग्रामपंचायत करांमध्ये सुट देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून लोकांनी लसीकरण करून घ्यावे जेणेकरून आपल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. ग्रामपंचायतीने लसीबाबत जो निर्णय घेतला आहे असाच निर्णय महाराष्ट्रातील सर्वत्र घेण्यात आला तर नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन कोरोना हद्दपार होऊ शकतो, अशा प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत.











