राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.













