loader image
[ays_poll id=7]

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !

Oct 20, 2021


राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 


अजून बातम्या वाचा..

महावितरणचा ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या पुढाकाराकरिता राष्ट्रीयस्तरावर गौरवआत्मनिर्भर भारत परिषदेत ‘इलेट्स इनोव्हेशन’ ॲवार्ड प्रदान

महावितरणचा ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या पुढाकाराकरिता राष्ट्रीयस्तरावर गौरव
आत्मनिर्भर भारत परिषदेत ‘इलेट्स इनोव्हेशन’ ॲवार्ड प्रदान

महावितरणने इलेक्ट्रिक व्हेईकलच्या अनुषंगाने पुढाकार घेत राज्यात केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय...

read more
.