Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महिलांना मोफत मिळाला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस!

Oct 21, 2021

प्रधानमंत्री उज्ज्वला योजेने अंतर्गत दारिद्ररेषे खालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप तालुक्याचे मा आमदार संजय पवार यांच्या हस्ते स्वरा इण्डेन गॅस वितरक यांचे मार्फत वितरीत करण्यात आले.

स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्‍वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील 5 कोटी महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करुन दिल्यामुळे महिलांच्या चेह-यावर हास्य फुलले आहे. ग्रामीण भागात पांरपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर झालेच त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. घरगुती इंधनासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती. परंतु या योजनेमुळे ग्रामीण भागातील घरापर्यत एल.पी.जी. सिलेंडर पोहचले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही योजना राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे घराघरापर्यत पोहचली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला केवळ एक अर्ज आपल्या जवळच्या एलपीजी वितरण केंद्रावर जाऊन सादर करावयाचा आहे. एलपीजी केंद्रावर अर्ज नि:शुल्क मिळतो. अथवा ऑनलाईन अर्ज भरता येतो. अर्ज सादर करताना अर्जदाराला आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक आहे. सोबतच पंचायत अधिकारी, नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. योजनेंतर्गत भरलेले अर्ज एसईसीसी 2011 या डाटासोबत जोडून तपासण्यात येतात. त्या आधारावर लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येतात. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला असावा. तसेच दारिद्र रेषेखालील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

यावेळी स्वरा इण्डेन गॅस वितरकचे संचालक दिलीप आव्हाड तसेच अरविंद आव्हाड, अनिल आंधळे, राजेंद्र वाघ, दत्तू आव्हाड, सोनू अहिरे, पिनू सोनवणे, हिरामण सोनवणे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

लाचखोरीचा कळस – तब्बल ५० लाखाची लाच मागणाऱ्या दिंडोरीच्या उप विभागीय अधिकारी ए सी बी च्या जाळ्यात

लाचखोरीचा कळस – तब्बल ५० लाखाची लाच मागणाऱ्या दिंडोरीच्या उप विभागीय अधिकारी ए सी बी च्या जाळ्यात

एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात लाचखोर अधिकाऱ्यांवर...

read more
राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

मनमाड :- ''आपल्या लेकरांना शिक्षण न देणाऱ्या पालकांना दंड देणारे राजर्षि शाहू महाराज, बहुजन-...

read more
सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव शहरातील एच आर...

read more
प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची गुरुकुमार नीकाळे यांची ना.आठवलेंकडे मागणी

प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची गुरुकुमार नीकाळे यांची ना.आठवलेंकडे मागणी

नाशिक जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा अशा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]