Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पोलीस स्मृती दिनानिमित्त माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन

Oct 21, 2021

नाशिक: देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी
भुसे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त नाशिक आयुक्तालय येथील शहिद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, पोलीस आयुक्त दिपक पांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपवनसंरक्षक वन विभाग पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, अप्पर पोलीस
अधीक्षक माधुरी कांगणे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
पोलीस दलातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करतांना कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. या जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी देशात 1 सप्टेंबर 2020 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या 377 पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व कर्मचारी याबरोबरच कोरोना काळात जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण पोलीस दलातील शहिद
झालेल्या 23 अंमलदारांची यावेळी नावे वाचून दाखविण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील शहिद पोलीस हवलदार निवृत्ती बांगारे यांच्या कुटुंबियांना माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मंत्री श्री.
भुसे यांनी उपस्थित असणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

अजून बातम्या वाचा..

लोकसभेच्या मा.सभापती सुमित्राजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडियन हायस्कुलचा शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न…

लोकसभेच्या मा.सभापती सुमित्राजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडियन हायस्कुलचा शताब्दी महोत्सव सोहळा संपन्न…

मनमाड 🙁 योगेश म्हस्के ) येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय...

read more
बघा व्हिडिओ – इंडियन स्कूल मनमाडच्या शताब्दी महोत्सवास उपस्थित राहत आमदार कांदे यांनी दिल्या शुभेच्छा

बघा व्हिडिओ – इंडियन स्कूल मनमाडच्या शताब्दी महोत्सवास उपस्थित राहत आमदार कांदे यांनी दिल्या शुभेच्छा

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंडियन हायस्कूल मनमाड च्या शताब्दी महोत्सव व माजी...

read more
१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव - समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]