Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावे!

Oct 21, 2021

नाशिक :- केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंटर, पायाभूत सुविधा, ब्रडिंग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधन यासाठी प्रशिक्षण
संस्थाबाबत अर्जदारांनी २५ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत आपले अर्ज विहित पध्दतीने सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सदर केंद्र पुरस्कृत योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, इच्छुक अर्जदारांनी कृषि विभागाच्या Link of PMFME website:
http://pmfme.mofpi.gov.in Link of MIS Application: http://pmfme.mofpi.gov.in/mis/#/Login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. तसेच या योजनेसाठी (Resource Person) संसाधन व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी देखील पात्र अर्जदारांनी २५ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत आपले अर्ज विहित पध्दतीने नाशिक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय येथे संध्याकाळी ५.३० पर्यंत
सादर करावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन या घटकांमध्ये कांदा या पिकाची निवड करण्यात आली आहे. असंघटीत अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धा क्षमतेत वाढ करणे तसेच शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थाच्या उत्पादनासाठी सर्वकष मुल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट व अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत प्रकल्पासाठी असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी
निगडीत पात्र प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्क्या पर्यंत व जास्तीत जास्त १० लाख रुपये या मर्यादेत प्रती प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]