Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांची दिवाळी गोड होणार !

Oct 22, 2021

दीपावली उत्सव काही दिवसांवर आला असताना केंद्र सरकारने दिवाळी आधीच केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता ३१ टक्के होणार आहे. या निर्णयाचा देशभरातील सुमारे ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे ९ हजार ४८८ कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. केंद्राने कोरोना महामारीमुळे महागाई भत्ता रोखला होता. त्यानंतर यावर्षी जुलैमध्ये सरकारने महागाई भत्ता आणि ‘डीआर‘ पूर्ववत केला होता. 

अजून बातम्या वाचा..

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे....

read more
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

मनमाड : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अनेक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]