नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीच्या पंचवटीतील कुमावतनगर येथे आज पहाटे साडेसहाच्या सुमारास गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटात परराज्यातून मोलमजुरीनिमित्त नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या एकाच घरातील सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे समजते.
पंचवटीतील पेठरोडवरील कुमावतनगर येथे टाईल्सचे काम करणारे परराज्यातील पाच ते सात जण राहतात. शुक्रवारी सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान टाइल्सचे काम करणाऱ्या एकाने सकाळी माचिसने बिडी पेटवली असता रूममध्ये गॅस गळती झाल्याने गॅसचा भडका झाला. या भडक्यात लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरंपाल (रा. सदर),विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्र) अशी नावे आहेत. जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.











