loader image
[ays_poll id=7]

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

Oct 4, 2026


विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करणे हा या मूल्यमापनाच्या प्रमुख उद्देशाने घेण्यात येणारी इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची मूल्यमापन चाचणी-१ (PAT-2) नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्याचे नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केले आहे.

या परीक्षेत प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा म्हणून इंग्रजी या तीन विषयांचा समावेश असेल. इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची या विषयांमध्ये चाचणी घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांवर अतिरिक्त परीक्षेचा ताण येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. चाचणीच्या निकालाच्या आधारे मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कृती कार्यक्रम आखणे, अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा करणे आणि शिक्षकांना अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी दिशा मिळणे अपेक्षित आहे.

इयत्ता दुसरीसाठी लेखी व तोंडी परीक्षेसाठी एकूण ३० गुण, तिसरी-चौथीसाठी ४०, पाचवी-सहावीसाठी ५०, तर सातवी-आठवीसाठी ६० गुण असतील. त्यानुसार लेखी व तोंडी परीक्षेसाठी अनुक्रमे ६० ते १२० मिनिटांचा कालावधी असेल. तोंडी परीक्षा लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थी संख्या अधिक असल्यास ती पुढील दिवशी घेता येईल.

चाचणीच्या प्रश्नपत्रिका अंदाजे २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६दरम्यान वितरित केल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता आणि गोपनीयता राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहणार आहे.


अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
.