जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवाना कृषी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं याहेतूने सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.
आता या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता मिळेल. या योजनेच्या नोंदणीसाठी आता रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आता रेशन कार्डच्या अनिवार्यतेसह इतर कागदपत्रांची सॉफ्टकॉपी पोर्टलवर अपलोड करता येईल.
या व्यतिरिक्त नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता दूर केली गेली आहे. आता पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. केंद्र सरकार शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत दुप्पट करण्याच्या विचारात आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. परंतु सरकारने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.













