loader image
[ays_poll id=7]

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीसाठी आता रेशन कार्ड आवश्यक!

Oct 22, 2021


जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवाना कृषी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं याहेतूने सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

आता या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता मिळेल. या योजनेच्या नोंदणीसाठी आता रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आता रेशन कार्डच्या अनिवार्यतेसह इतर कागदपत्रांची सॉफ्टकॉपी पोर्टलवर अपलोड करता येईल.

या व्यतिरिक्त नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता दूर केली गेली आहे. आता पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे.  केंद्र सरकार शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत दुप्पट करण्याच्या विचारात आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. परंतु सरकारने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.


अजून बातम्या वाचा..

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकोरा येथे आरोग्य विषयक शिबिर संपन्न !

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकोरा येथे आरोग्य विषयक शिबिर संपन्न !

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे...

read more
उपोषणात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई – एसटी महामंडळ !

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी – एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार !

महाराष्ट्र एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी संपाची घोषणा केली होती, थकीत वेतन व महागाई भत्ता मिळावा...

read more
कोरोनामुळे छत्र हरपलेल्या बालकांना ५ लाखांच्या अनुदान मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप !

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या बालकांना ५ लाखांच्या अनुदान मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप !

गेल्या दीड ते दोन वर्षात कोरोना विषाणूने अनेक घरे उध्वस्त केलीत, अनेक घरातील प्रमुख कर्तेच निघून...

read more

रेल्वे मध्ये सुरु असलेले खाजगीकरण बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत – खा.संजय राऊत यांना निवेदन !

रेल्वे मध्ये सुरु असलेले खाजगीकरण बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, मनमाड केंद्रीय रेल्वे इंजिनिअरिंग...

read more
.