loader image

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकोरा येथे आरोग्य विषयक शिबिर संपन्न !

Oct 27, 2021


नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर तसेच शैक्षणिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन सौ.विशाखाताई भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाले.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव विधानसभा, रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन, रोटरी अमरावती मिडटाऊन मेमोग्राफी व साकोरा ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, आजारा बाबत आपल्या समस्या लवकर कोणाकडेच सांगत नाही व महिलांचे आरोग्य सदृढ राहावे या उद्देशाने महिलांसाठी स्तनाचे व गर्भाशयाचे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजान करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. यात 178 महिलांची तपासणी करण्यात आली.

सदर कार्यक्रमात 370 विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्याचबरोबर लॉक डाउन काळामध्ये विद्यार्थ्यांची अध्यापनाची परवड लक्षात घेऊन ग्रामीण भागातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लासेसची व्यवस्था नसल्यामुळे पुणे येथील क्लासेसच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत क्लासेसची सेवा मिळवून देण्याची ही व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे, त्याचेही प्रात्यक्षिक साकोरे गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत देण्यात आले.

तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, विशाखाताई भुजबळ, महिला विधानसभा अध्यक्ष डॉ.नीलिमा अहिरे, महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील, दीपक शेलार, डॉ.ज्योती सिंग, प्रमोद वाघ, मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील , साकोरा उपसरपंच घनश्याम सुरसे, दत्तू पवार, राजेंद्र लाठे, राजाभाऊ सावंत, देविदास पगार, किरण बोरसे आदि उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र सुरसे यांनी केले प्रसंगी अमित पाटील, देवदत्त सोनवणे, दया जुन्नरे, योगेश बोरसे, सुनील सुरसे, शिवाजी सोनवणे, वृषभ बोरसे, चंद्रकला बोरसे, छाया बोरसे, निर्मला सुरसे, अलका हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले व ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी सरोदे व कर्मचारी सोमनाथ उडकुडे, समाधान वाघ,तसेच रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही सहकार्य सहकार्य केले. अमित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा – गुड शेफर्ड हायस्कूलने मारली बाजी, उपविजेता एच.ए.के.हायस्कूल क्रिकेट संघ

मनमाड:- मनमाड क्रिकेट समिती आयोजित महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,मनमाड येथे माध्यमिकस्तरीय...

read more
इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

इंदूर – पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी – मागणी !

चांदवड - मनमाड मार्गाच्या  दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने इंदौर पुणे  महामार्गावर रोजच वाहतूक...

read more
.