loader image
[ays_poll id=7]

कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण : कृषी मंत्री दादा भुसे!

Oct 23, 2021


कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला व या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घरपोच उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव लावून घ्यावे, त्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ-मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिवाळीपूर्वी शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील. 

राज्य शासनाचा कृषी विभाग व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे सहसंचालक संजीव पडवळ, आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा

मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड कारखाना शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
.