Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मतदार यादीतील दुबार नावे कमी करण्याचे आवाहन!

Oct 23, 2021

मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 15 मतदार संघात मतदार नोंदणी अधिकारी यांच्यास्तरावर पडताळणीचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मतदार यादीत दुबार नाव असल्यास फॉर्म नंबर 7 भरून नाव कमी करून घेण्याचे आवाहन मतदार
नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, मतदार नोंदणी अधिकारी 123 नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ यांचेकडील मतदार यादीत मतदारांची दुबार नावे असल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर मतदार यादीतील दुबार नावांच्या पडताळणीचे
कामकाज सुरू आहे. प्राप्त मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी करण्यासाठी नागरिक,राजकीय पक्ष, अन्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांना खात्री करता यावी यादृष्टीने दुबार मतदारांच्या याद्या www.nashikmitra.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
या याद्यांची यथोचित पडताळणी झाल्यानंतर विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाव वगळण्याबाबत कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर करण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यादीत नमुद मतदारांच्या रहिवासाच्या ठिकाणी भेट देऊन घरोघर तपासणी करणार आहेत. सदर तपासणी दरम्यान सर्व मतदार, नागरिक,राजकीय पक्ष यांनी यादीतील नावांची पडताळणी करुन दुबार नाव नोंदविले गेले असल्यास ज्या ठिकाणी संबधित मतदाराचा सर्वसाधारण रहिवास आहे, त्या मतदार यादीतील नावंकायम ठेऊन दुसऱ्या मतदार यादीतील नावे तातडीने वगळण्यात यावे त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे फॉर्म 7 भरुन देणे आवश्यक असल्याचेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. मतदारांना त्यांच्या नावाची खात्री करावयाची असल्यास www.nvsp.in संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, मतदारांना मतदार नोंदणीबाबत अधिक माहिती हवी असल्यास कार्यालयीन वेळेत टोल फ्री क्रमांक 1950 व संबधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]