Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तालुका विधी सेवा समिती मार्फत कायदेशीर शिबीराचे आयोजन !

Oct 23, 2021

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे पॅन इंडिया अॅवरनेस व आऊटरिच कॅम्पेयन नुसार तालुका विधी सेवा समिती व मनमाड न्यायालय यांचे संयुक्त विद्यमाने मनमाड शहरात विविध ठिकाणी कायदेशीर शिबीराचे आयोजन करण्यात आले. मनमाड रेल्वे न्यायालयातील मा.न्यायमूर्ती श्री घुले साहेब यांचे अध्यक्षते खाली व मनमाड शहर कोर्टातील मा.न्यायमूर्ती मा.लोमटे मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत रेल्वे कोर्ट आवारात कायदेशीर शिबीराचे आयोजन करण्यात आले.त्यात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे कार्य व उद्दिष्टे याबाबत लोमटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले व कामगार कायदा व कामगारांचे अधिकार हयाबाबत घुले सर ह्यांनी माहिती दिली, शिबीरात रेल्वे परिसरात काम करणारे वेडंर व कुली बांधव उपस्थित होते.
त्याचप्रमाणे लहान मुलां विषयक कायदे व त्याबाबत माहिती व जनजागृती होणे साठी रिमांड होम ,मनमाड येथे कायदेशीर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले त्याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य व प्रमुख वक्ते अॅड. रमेश अग्रवाल व अॅड. मुनिया गुप्ता यानी तेथिल लहान मुलांना विचारपुस केली व त्यांना मार्गदर्शन केली,त्याप्रसंगी रिमांड होम चे अधिक्षक श्री आर.के.शेळके व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
तसेच मनमाड येथिल संत बार्णबा हायस्कूल मध्ये देखील कायदे विषयी शिबिर घेण्यात आले, तेथिल शाळेतील विद्यार्थ्यांना लहान मुलांवर होणारे अत्याचार व त्याबाबत असलेले कायदे विषयी माहिती देण्यात आली आली, अॅड.रमेश अग्रवाल, यांनी लहान मुलांचे हक्क व त्यांचे वर शारिरीक, मानसिक, लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी व त्याबाबत असलेले कायदे याबाबत मार्गदर्शन केले तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदे बाबत अॅड. पुजा मल्हारे, यांनी व लहान मुलांचे शैक्षणिक अधिकार बाबत अॅड. यास्मिन शाह यांनी मार्गदर्शन केले तसेच अॅड. मुनिया गुप्ता यानी लहान मुलांचे कायदे विषयी माहिती दिली, त्याप्रसंगी अॅड. राजेंद्र पालवे, विना संकलेचा, यश पांडे ,मनमाड न्यायालयातील कर्मचारी निकम भाऊसाहेब उपस्थित होते. उपस्थित मान्यवरा चे संत बार्णबा हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.कराड सर यांनी स्वागत केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेजवळ मॅडम यांनी करून आभार प्रदर्शन श्री वेताळ सर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]