मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच शालेय ग्रंथालयातील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणा-या विविध विषयांवरील पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती. संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजीयानी मॅडम,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम तसेच शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनातील पुस्तकांचे वाचन केले. यावेळी विदयार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उर्दू व मराठी माध्यमातील विद्यार्थी, विदयार्थीनींनी व शिक्षक, शिक्षिकांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.व पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले. नियमित वाचनाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले. संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...