भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, सन 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत जेथे मतदान केले आहे, त्या सर्व मतदान केंद्रावर, नोव्हेंबर 2021 या महिन्याच्या प्रत्येक रविवारी दिनांक ०७-११-२०२१, १४-११-२०२१, २१-११-२०२१ आणि २८-११-२०२१ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतपर्यंत फोटो मतदार यादी प्रदर्शित केली जाणार आहे, देशातील जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक निवडणूकीत जागरूकतेने मतदान करणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे म्हणूनच आपण आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची पूर्ण खात्री करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी मनमाड मंडलच्या वतीने करण्यात आली आहे. जर मतदार यादीत आपले नाव असेल तर त्यात कोणतीही प्रकारची (पूर्णनाव,रहिवासी पत्ता, वय,फ़ोटो व इतर) चूक नाही याची खात्री करावी , जर काही चूक असेल तर, नंतर तुम्ही दुरुस्तीसाठी फॉर्म भरू शकतात. या व्यतिरिक्त, नवीन मतदार नोंदणी साठी आपण नवीन आवेदन फॉर्म या दिवशी भरण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
नवीन मतदार नोंदणी करून मतदान कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
१) दोन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे.(फोटो)
२) रेशन कार्डची छायाप्रत.(झेरॉक्स कॉपी)
३) आधार कार्डाची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).
४) जन्मतारखेच्या नोंदी ची छायाप्रत.(झेरॉक्स कॉपी)
(नवीन मतदार नोंदणी करतांना आवेदकांचे वय 01 जानेवारी 2022 रोजी १८ वर्षांचे पूर्ण असणे आवश्यक आहे.)
५) घरातील कोणत्याही एका सदस्याच्या मतदार कार्डाची छायाप्रत(झेरॉक्स कॉपी).
निवडणूक आयोग ने नियुक्ती केलेले बीएलओ (मतदार नोंदणी अधिकारी) या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.











