Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पिंपळगाव कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला सापडली 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता !

Oct 24, 2021

दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील ६ कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारीची कार्यवाही केली होती. यात  आयकर विभागाला व्यापाऱ्यांकडे 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे वृत्त आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी आयकर विभागामार्फत छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल ऐंशी अधिकारी होते. प्राप्त झालेली रोकड मोजण्यासाठी त्यांना  अठरा लागलेत. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

या कारवाईवर माजी आमदार मारोतराव पवार यांनी आक्षेप घेतला आहे. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त येतात, तेव्हाच अशी कारवाई का केली जाते, आपण कुठल्याही नियमबाह्य कामाचे समर्थन करणार नाही. मात्र, केवळ दरवाढ झाल्यावरच छापेमारी करणे योग्य नाही. ही कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]