Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

Oct 24, 2021

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज येवला विश्रामगृह येथे निफाड व येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याबैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसिलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस शैलजा कृपास्वामी, मनमाड महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, येवला महावितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता आर. एम. पाटील, येवला नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नांदूरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका कृषि अधिकारी ए. एस. आढाव, बी.जी. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, डॉ. हर्षल नेहेते, येवला गट विकास अधिकारी डॉ. उमेष देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. पुरी, जे. डी. हगवणे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मालेगावच्या धर्तीवर धर्मगुरू यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. रुग्णसंख्या कमी करण्याकरीता त्रिसूत्रीच्या वापरासोबतच लसीकरण महत्त्वाचे आहे. शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

तालुक्यात सुरू करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीसोबत समन्वय साधून प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी नियोजन करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल सादर करण्यात यावा, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी अतिवृष्टीबाधित परिस्थितीचा आढावा घेतांना सांगितले. यासोबतच वीज वितरण कंपनीच्या वीज देयकांच्या थकबाकी व वसूलीबाबत देखील माहिती घेतली.

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]