Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मंत्री छगन भुजबळ धावले अपघात ग्रस्तांच्या मदतीला…

Oct 24, 2021

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असतांना दौरा आटोपून पुढच्या कार्यक्रमासाठी निफाड कडे जात होते. यावेळी येवला विंचूर रस्त्यावर धुळगाव फाटा येथे नुकताच एका कारचा अपघात झालेला होता. याठिकाणी त्यांनी थांबून अपघाताची पाहणी केली.

यावेळी सोबत असलेल्या पदाधिकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत त्याठिकाणी थांबत अपघात ग्रस्तांना मदत केली. अपघात ग्रस्तांना रुग्णवाहिकेत बसविल्यानंतर त्यांनी तातडीने येवला येथील डॉक्टरांना फोनवरून संपर्क करत अपघात ग्रस्तांना दाखल करून उपचार करण्याच्या सूचना केल्या. तसेच यासाठी आपल्या कार्यालयातील लोकांना अपघात ग्रस्त ठिकाणी थांबवून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा सूचना केल्या.

येवला- नाशिक या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती चालू आहे. ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे चालू असतील अश्या ठिकाणी ठळक अक्षरात वाहनांना योग्य दिशा दर्शविण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले त्याचप्रमाणे गरज असल्यास वाहतूक विभागाची मदत घेऊन वाहतूक वळविण्यात यावी असे आदेश देखील मंत्री भुजबळ यांनी दिले.

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]