रेल्वे मध्ये सुरु असलेले खाजगीकरण बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, मनमाड केंद्रीय रेल्वे इंजिनिअरिंग कारखानाला कच्चा माल व नवीन वर्कऑडर मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, रेल्वे ट्रेंड अॅप्रेटिंस यांना रेल्वे मध्ये सामाविष्ट करण्यात यावे,मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन मनमाड दौऱ्यावर असलेल्या खा.संजय राऊत यांना ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड यांच्या वतीने देण्यात आले. असोसिएशन तर्फे कारखाना शाखा अतिरिक्त सचिव रमेश पगारे व कारखाना शाखा उपाध्यक्ष सागर गरूड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सदर निवेदन दिले. शिष्टमंडळात सागर साळवे, सचिन इंगळे, कल्याण धिवर, शरद झोंबडं, विनोद खरे आदींचा समावेश होता.
निवेदनातील सर्वच मुद्द्यावर सकारात्मक विचार होईल असे आश्वासन यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले.
अंजलीना झेवियर यांचा सत्कार
रोटरी क्लब ऑफ मनमाड च्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेल्या सेंट झेवियर स्कूल मधील...












