Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण शिबिर संपन्न.

Oct 25, 2021

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे (एनसीसी) सात दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
50 महाराष्ट्र एनसीसी बटालियन औरंगाबाद व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय शिबिर झाले.यावेळी एनसीसी कॅडेटना शस्त्र प्रशिक्षण, उत्तम कवायत व ड्रिल प्रशिक्षण,योगा, आपत्ती व्यवस्थापन,युद्धकला, व्यक्तिमत्व विकास, स्वच्छता अभियान आदी विषयांवर सलग सात दिवस सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत अभ्यास वर्ग घेण्यात आले. 50 महाराष्ट्र एनसीसी बटालियन औरंगाबादचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अभिजीत बर्वे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रकाश बर्डे, हवालदार अनिल सिंग, हवालदार भूपेंद्र सिंग,सिनिअर अंडर ऑफिसर संदेश गांगुर्डे,कॉटर मास्टर पवन आहेर यांनी काम केले. सदर कॅम्प मध्ये एनसीसी विभागाचे 53 कॅडेट्सनी सहभाग घेऊन सैनिकी जीवनाचा अनुभव घेतला. कॅम्पचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उपप्राचार्य डॉ. पी.जी.आंबेकर, उपप्राचार्या श्रीमती ज्योती पालवे,कुलसचिव समाधान केदारे, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे, कनिष्ठ पर्यवेक्षक श्री.विठ्ठल फंड व कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अभिजीत बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रकाश बर्डे व एनसीसी कॅडेट्सनी केले.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]