Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मी शिवसेना मोठी केली तेव्हा संजय राउत सेनेतही नव्हते : भुजबळांचा टोला !

Oct 25, 2021

मी शिवसेना मोठी केली तेंव्हा राऊत सेनेत देखील नव्हते, संजय राऊत साहेब हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे या शिल्पाला तडा जाऊ नये याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे, असा टोला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  भुजबळ फार्म येथे पत्रकार परिषदेत लगावला. 

संजय राऊत कुठल्या उद्देशाने बोलले मला माहित नाही. पण पाहुणचार घेण्याची मला सवय आहे. शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो अस म्हटलो हे मान्य आहे. मात्र कुणालाही पक्षात काम केल्या शिवाय जबाबदारी मिळत नाही.संजय राऊत राऊत यांनाही सामनाचं संपादक काम केल्यानेच मिळाले आहे. मी जेव्हा शिवसेना मोठी केली तेंव्हा ते खासदार देखील नव्हते, असा टोला देखील भुजबळ यांनी लगावला.

राऊत यांना मी नांदगावला आमंत्रित करतो. त्यांनी या मतदार संघात परत यावे. नांदगाव मतदार संघ विसरा अस ते म्हणाले या बाबत मला पवार साहेबांशी बोलावं लागेल असा दम भरत नांदगाव मध्ये गेल्या दहा वर्षांपासून आम्ही काम केलंय त्यामुळे मी नांदगावला कसा विसरेन असा इशारा त्यांनी दिला. 

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]