loader image
[ays_poll id=7]

फेसबुक आता मेटा नावाने ओळखले जाणार !

Oct 29, 2021

सोशल मिडीयावर आपली एक वेगळी छाप टाकणाऱ्या फेसबुकचे आता नाव बदलण्यात आले असून यापुढे फेसबुक “मेटा” या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकच्या होल्डिंग कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली

आपल्यावर एक डिजिटल जग बनले आहे. ज्यात व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट आणि एआयचा समावेश आहे. मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल, असा आम्हाला विश्वास असल्याची माहिती देखील झुकरबर्ग यांनी दिली. नाव बदलण्याबरोबरच आता कंपनीमध्ये रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. मैटावर्ससाठी आपल्याला हजारो लोकांची आवश्यकता आहे, अशी घोषणाही कंपनीने केली होती. सध्या कंपनी 10 हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे

फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये 2021 मध्ये 10 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने त्यांचा व्हर्चुअल रिऑलटी सेगमेंट एवढा मोठा झाला आहे, की आता तो आपल्या उत्पादनांना दोन श्रेणीमध्ये विभागू शकतो अशी घोषणा केली होती.

फेसबुकच्या या घोषणेनंतरही, मूळ अॅप आणि सव्हेिंस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे रीबॉडिंग आहे आणि कंपनी इतर प्रोडक्ट्स जसे, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम कंपनीच्या नव्या बॅनरखाली आणण्याची योजना आहे. आतापर्यंत, वॉट्सअॅप, इंस्टाग्रामला फेसबुकचे प्रॉड्क्ट्स म्हटले जात होते. मात्र, फेसबुक स्वतःच एक प्रोडक्ट आहे

अजून बातम्या वाचा..

अपंग,रुग्ण,ज्येष्ठ नागरिक तथा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सावलतींना रेल्वे विभागाची कात्री – प्रवाशांमध्ये नाराजीचा

अपंग,रुग्ण,ज्येष्ठ नागरिक तथा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सावलतींना रेल्वे विभागाची कात्री – प्रवाशांमध्ये नाराजीचा

भारतीय रेल्वे प्रवाशांना साठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं विविध...

read more
मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. समिर सिंह साळवे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. समिर सिंह साळवे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.समीरसिंह साळवे यांना त्यांनी गडचिरोली येथे कार्यरत...

read more
राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवीन सात राष्ट्रीय विक्रमांसह आकांक्षा व्यवहारे ला सुवर्णपदक

राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवीन सात राष्ट्रीय विक्रमांसह आकांक्षा व्यवहारे ला सुवर्णपदक

भुवनेश्वर ओरिसा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ ज्युनिअर, सिनियर, वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी...

read more
मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हीची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७ राष्ट्रीय विक्रमांची नोंद

मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हीची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७ राष्ट्रीय विक्रमांची नोंद

शहरातील प्रसिद्ध वेटलिफ्टींग कोच, प्रसिद्ध क्रीडा शिक्षक प्रवीण व्यवहारे यांची पुतणी तसेच...

read more
.