मनमाड वर्कशॉप मधील स्टोअर डिपार्टमेंट मधील कर्मचारी अशोक घाटे यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
झोनल सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला. झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम व जेष्ठ कार्यकर्ते फकीरा सोनवणे यांच्या हस्ते अशोक घाटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, बहुजन युवक संघाचे अध्यक्ष रोहित भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा कार्यालय सचिव संदीप पगारे, गुलाब वैरागर, निखिल सोनवणे, अर्जुन बागुल, जयंत जगताप, मधुकर सदगिर आदी उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशन मनमाड शाखेच्या अध्यक्षपदी डॉ शांताराम कातकडे तर सरचिटणीसपदी डॉ रवींद्र राजपूत यांची निवड
इंडियन मेडिकल असोसिएशन मनमाड शाखेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल श्रीलीलामध्ये...










