Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिवाळी सणासाठी बाजारपेठा सजल्या….खरेदीसाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद!

Oct 30, 2021

हिंदु समाजातील सर्वात मोठा असणारा सण म्हणजे दिवाळी, गरीब असो वा श्रीमंत जो-तो आपल्या परीने दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.

दर वर्षी दिवाळी सणामध्ये प्रत्येक नागरिक हे आपल्या परिवारासह बाजार पेठेमध्ये खरेदी करत असतात.या साठी बाजारामध्ये मोठी गर्दी होत असते. गेल्या वर्षी दिवाळी सणावर कोरोना परिस्थितीचे सावट असल्याने दिवाळी साजरी करण्यावर मर्यादा होती.यंदाच्या वर्षी कोरोना परिस्थिती कमी झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी मोठी उलाढाल केली असुन बाजारपेठे मध्ये सर्व प्रकारची दुकाने लावण्यात आली आहे. दिपावली साठी लागणारे आकाशकंदील , रांगोळी , पणत्या , खाद्य पदार्थ , कपडे , पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची आदी दुकाने बाजारपेठेत लावण्यात आली असुन , ग्राहकांचा मात्र खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्याचे युग हे डिजिटल असल्याने याचे परिणाम हे सणामध्ये बाजारपेठेत होणाऱ्या खरेदीवरही जाणवत आहे. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल फोन आल्याने त्यांचा साठी ऑनलाईन बाजारपेठ वापरणे सोपे झाले आहे. सणानिमित्ताने सर्वच कंपन्या या ऑनलाइन खरेदीवर कमी किंमती सह आकर्षक सूट देत असतात , यामुळे साहजिकच नागरिक याकडे आकर्षित होऊन खरेदी करत असतात, परिणामी प्रत्येक शहरातील बाजारपेठेवर याचे परिमाण होऊन ग्राहक कमी होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]