मनमाड येथील समता मित्र मंडळाच्या वतीने मनमाड शहर पातळीवर भव्य कब्बडी स्पर्धैचे आयोजन बापुनगर जनार्दन नगर शेजारी, नगर चौकी रोड, मनमाड येथे करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी सर्व संघांचा शपथ विधी झाला. सदर स्पर्धेचे उद्घाटन महात्मा गांधी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ एन.व्ही.पाटील व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते अंबादास निकम, राष्ट्रीय कबड्डी पंच सतिश सुर्यवंशी नगरसेवक लियकत शेख, कामगार नेते प्रदीप गायकवाड, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अशोक गरुड, वरिष्ठ कबड्डी खेळाडू मोगल अहिरे, सुदाम बागुल, श्रीराज कातकडे, प्रमोद गांगुर्डे, दिलीप सुर्यवंशी, प्रणव कातकडे, प्रा.बर्डेसर, सुरेश शिंदे, कामगार नेते शबरिश नायर, शेखर अहिरे, प्रशांत सानप, मुकुंद झाल्टे, सुधाकर कातकडे, दत्तु जाधव व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन पिटर फेरो यांनी केले तर आभारप्रदर्शन आकाश हिरवळे यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समता मित्र मंडळ चे वरिष्ठ खेळाडू वाल्मिक बागुल व राहुल बागुल यांनी केले.
उद्घाटन सामना समता मित्र मंडळ (अ) व नवयुवक क्रीडा मंडळ या दोन संघा मध्ये खेळविण्यात आला.सदर सामण्यात समता मित्र मंडळ विजयी झाले उद्घाटन सामन्यासाठी पंच अमोल विसनकर, गणेश घुगरे व सचिन पगारे यांनी व गुण लेखन म्हणुन पिटर फेरो यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल बागुल,अजित चौधरी,विजय त्रिभुवन, विनोद अहिरे, अविनाश केदारे,अनिकेत झोडपे, रोहन बागुल, अर्जुन बागुल, सुरेशं अहिरे, उज्ज्वल पगारे,मयुर केदारे, सिध्दार्थ महिरे, सिध्दार्थ अहिरे,संघनिल पगारे,आदी प्रयत्नशील आहे.
फलक रेखाटन – दि. 15 ऑगस्ट 2025. 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.
15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या...












