loader image
[ays_poll id=7]

आता पेन्शनर्सना व्हिडीओ कॉलद्वारे हयातीचा दाखला सादर करता येणार : SBI

Oct 31, 2021


जेष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला सादरकरण्यासाठी वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागतात यावर उपाय म्हणून भारतीय स्टेट बँक 1 नोव्हेंबर 2021 पासून पेन्शनधारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करत आहे. या अंतर्गत बँकेतील पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडीओ कॉलद्वारे त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतात. SBI ने या नवीन सुविधेला व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सर्विस असे नाव दिले आहे.

व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवा ही एक सोपी आणि सुरक्षित पेपरलेस आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये पेन्शनधारकाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. यासाठी निवृत्तीवेतनधारकांना अधिकृत वेबसाईट https://www.pensionseva.sbi/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ड्रॉप डाऊनमधून ‘व्हिडीओ एलसी’ निवडल्यानंतर तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक प्रविष्ट करा. यानंतर पेन्शनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करा. त्यानंतर नियम आणि अटी स्वीकारा आणि ‘स्टार्ट जर्नी’ वर क्लिक करुन दिलेल्या सुचनांचे पालन करीत आपला हयातीचा दाखला सादर करु शकतात.

याशिवाय पेन्शन प्रोफाइल तपशील, गुंतवणूक माहिती आणि जीवन प्रमाणपत्र स्थिती देखील तपासली जाऊ शकते. बँकेत केलेल्या व्यवहारांची माहितीही या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.