महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे रविवारी (३१ ऑक्टोबर) रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तसेच इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद भोसले यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिवस निमित्ताने सामुहिक शपथ घेण्यात आली.याप्रसंगी संदीप आवारे, अमर पोपळघट, दत्तू ठाकरे,
योगेश सानप, विनायक डावखर हे कर्मचारी उपस्थित होते.
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया
बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...










