Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मांजरपाडा योजनेत नांदगावचा समावेश – पालकमंत्री भुजबळ !

Nov 2, 2021

गेल्या अनेक दशकापासून दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ख्याती असलेल्या नांदगाव तालुक्याचा मांजरपाडा योजनेत समावेश करण्यात येणार असून मंत्रीमंडळाच्या मान्यतेने त्यावर शिक्कामोर्तब केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. पार – कोकण उपसा जलसिंचन योजनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मांजरपाडा योजनेत नांदगाव तालुक्याचाही समावेश करण्यात येणार आहे.

मांजरपाड्याचे पाणी नांदगाव तालुक्यालाही देण्याबाबत पालकमंत्री भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासनामा पुस्तिकेद्वारे आश्वासन दिलेले होते. अवघे ५ टक्के जलसिंचन असलेल्या नांदगाव तालुक्याला पाणी देण्यासाठी मांजरपाडा (देवसाने) हाच एकमेव पर्याय असून, पालकमंत्र्यांनी आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊल उचलत नांदगाव तालुक्याला दिलासा द्यावा, म्हणून नांदगाव तालुका जलहक्क समितीने ना. भुजबळ यांची येवला येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी याविषयी माहिती दिली. जलहक्क समिती कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून येवल्यानंतर नांदगाव तालुक्यालाही मांजरपाडा योजनेतून पाणी देण्याबाबत दिशा ठरविण्याचे पालकमंत्र्यानी मान्य केले असल्याची माहिती समिती अध्यक्ष अशोक परदेशी यांनी दिली आहे.

दीपावलीनंतर यासंदर्भात नाशिक येथे बैठक घेण्यात येणार आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष अशोक परदेशी, विशाल वडघुले, अंबादास मोरे, रमेश खरे, युनूस पठाण, पुंडलिक कचरे, शमशाद सय्यद, सुषमा तिवारी उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

मनमाड ता ८ :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात भीमोत्सवाला सुरवात झाली असून...

read more
फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचा पाठिंबा

फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचा पाठिंबा

बार्टीकडे अर्ज केलेले व सर्व पात्रता अटी पूर्त केलेले फेलोशिप साठी पात्र असलेले संशोधक विद्यार्थी...

read more
नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]