Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहरात शिवसेना व युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन !

Nov 3, 2021

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव शहरात शिवसेना व युवासेनेच्या उद्घाटन सोहळा संपन्न झाला. नांदगांव शहरात शांती बाग, बसस्थानक, होलारवाडा, पावर हाऊस, हुतात्मा चौक, देवी गल्ली, पाटील गल्ली, स्वामी विवेकानंद नगर, नागेश्वर मंदिर चौक, नेहरू नगर, रेल्वे गेट रिक्षा युनियन, तीन नंबर गल्ली, गुरुकृपा नगर, कैलास नगर, लक्ष्मीनगर, हमालवाडा, मोठी होळी, एस टी कॉलनी, गांधीनगर, आनंद नगर आदी भागात शिवसेनेच्या २२ व युवासेनेच्या १४ अशा ३६ शाखा शाखांचे उदघाटन करण्यात आले. नांदगाव शहरात व तालुक्यात आज पर्यंत कोणत्याही पक्षाने एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शाखा उद्घाटन केले नव्हते. परंतु आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघ भगवामय होत असून याचाच भाग म्हणून आज नांदगाव शहरात शिवसेना आणि युवासेनेच्या एकुण 36 शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख किरण देवरे, नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे, जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जगताप, संतोष गुप्ता, विष्णू निकम, विलास आहेर, गुलाब भाबड, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे, शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव,युवासेना शहर प्रमुख मुज्जमील शेख, सुधीर देशमुख, राजाभाऊ देशमुख, आनंद कासलीवाल, सचिन साळवे, रवी पवार, बाळासाहेब शेवरे, याकुब शेख, भैय्यासाहेब पगार, भाउराव बागुल, आरिफ शेख, शशि सोनवने, अय्याज शेख, सद्दाम शेख, विभाग प्रमुख किरण फुलारे, संतोष भोसले, अरुण भोसले, पिंटू आहेर, मयूर लोहाडे, चेतन इघे, कुणाल देशमुख, जहीर सौदागर, शरीफ शेख, भरत पारख यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]