loader image
[ays_poll id=7]

१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान नवीन नाव नोंदणी व सुधारणा मोहीम !

Nov 6, 2021


राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान नवीन नाव नोंदणी व सुधारणा मोहीम हाती घेतली आहे. यात नाव मतदार नोंदणी व मतदारांच्या नावात किवा इतर माहितीत काही बदल अपेक्षित करावयाचे असल्यास ते करता येणार आहेत, तरी १ जानेवारी २०२२ रोजी ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींनी आपली मतदार नोंदणी करण्याचे आवाहन मनमाडचे मुख्याधिकारी, नगरपरिषद तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी, नांदगाव विधानसभा मतदार संघ यांचे वतीने करण्यात आले आहे.

मतदार नोंदणी कशी कराल ?

www.nvsp.in या संकेतस्थळावर आपली नोंद करा.

▶️ नविन मतदार नोंदणीसाठी फॉम नं.६ भरा

▶️ मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी फॉम नं. ७ भरा

▶️ मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी फॉम नं. ८ भरा.

▶️ मतदार यादीतील नाव स्थलांतरीतसाठी फॉम नं. ८-अ भरा

फॉर्म पूर्णपणे भरून त्यासोबत एक फोटो, ओळखपत्र व रहिवासी पुरावा जोडा.

  • ओळखपत्र : पॅन कार्ड, जन्माचा दाखला, ड्रायव्हींग लायसन्स ई.
  • रहिवासी पुरावा : रेशन कार्ड, वीज बिल, मालमत्ता कर पावती, पाणीपट्टी पावती, गैस कनेक्शन पुस्तक, टेलिफोन बिल, बँक पासबुक, इन्कम टॅक्स पावती.

■ पुर्णपणे भरलेला फॉर्म कागदपत्रांसह आपल्या जवळच्या मतदान केंद्रात अथवा BLO यांचेकडे जमा करावा.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.